शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

अखेर नांदूरमध्यमेश्वरला मिळाला 'रामसर' दर्जा; आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:40 PM

रामसर दर्जा मिळवणारे राज्यातील एकमेव स्थळ

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतिक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबत घोषणा शनिवारी केली.  त्याचे पत्र लवकर नाशिक वन्यजीव विभागाला प्राप्त होणार आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही यास दुजोरा दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी वनविभागाने राज्य व केंद सरकारला याबाबत चा सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाणथळ म्हणून हे राज्यातील पहिले ठिकाण ठरले. गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला रामसरचा दर्जा मिळावा, यासाठी वनविभागातर्फे पाठपुरावा सुरू होता. स्वित्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.  सध्या देशातील २६ पाणथळांच्या यादीत नांदूरमध्यमेश्वरचा समावेश आहे. सस्तन वन्यजीवांच्या आठ, तर चोवीस प्रजातींचे मासे, २६५ पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्षी, पाचशेपेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार, ४१ प्रजातींचे फुलपाखरू आणि विविध पाणवनस्पती, अशी जैवविविधता या अभयारण्यात आहे. 'रामसर'मध्ये आढळणाऱ्या १४८ स्थलांतरीत पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूरमध्यमेश्वरमध्ये पहावयास मिळतात. शिवाय देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजाती असून, दरवर्षी वीस हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद तिथे होत असल्याची बाजू प्रस्तावात जमेची ठरली आहे. नांदूरमध्यमेश्वरला हा दर्जा प्राप्त झाल्याने, वैभवशाली पाणथळांच्या ठिकाणांत नाशिकची जगाच्या नकाक्षावर नवी ओळख निर्माण होईल. रामसरचा दर्जा मिळाल्याने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पावले इकडे वळण्याचा मार्ग खुला झाला. संवर्धनासह वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे मत वनधिकाऱ्यांनी व्यक्त केले.