शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’!

By admin | Published: February 06, 2015 1:01 AM

अनेकदा गुन्हा घडल्यानंतर सबळ पुरावे नसल्याच्या कारणांमुळे शोधकार्यात अडथळे येतात. परंतु गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे होऊ शकते.

पोलीस विभागासाठी ठरू शकते फायदेशीर : सूक्ष्म पुरावे गोळा करण्यासाठी उपयुक्तयोगेश पांडे - नागपूरअनेकदा गुन्हा घडल्यानंतर सबळ पुरावे नसल्याच्या कारणांमुळे शोधकार्यात अडथळे येतात. परंतु गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे होऊ शकते. अशा गुन्ह्यांमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ची मदत फार मोलाची ठरू शकते, अशी माहिती मुंबई पोलीस विभागाच्या मानद पोलीस समुपदेशक व ‘फॉरेन्सिक’ विषयातील संशोधक कामिनी भोईर यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पोरवाल महाविद्यालय व इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन्सिक सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयसीएफएम-२०१५’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानीत आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.वेळ व पैसा यांची बचत‘नॅनोपार्टिकल’ आणि ‘टिटॅनियम डायआॅक्साईड’ यांच्या उपयोगातून खडबडीत पृष्ठभागावरील ‘फिंगरप्रिंट’देखील गोळा केले जाऊ शकतात. शिवाय ‘गोल्ड नॅनोपार्टिकल’मुळे तर ओली जागा किंवा वस्तूवरील ‘फिंगरप्रिंट’देखील घेता येते. ‘एएफएम’च्या उपयोगाने रक्ताच्या वाळलेल्या डागांचे परीक्षण करून ते किती वेळ अगोदरचे आहेत, हे अचूकपणे सांगता येणे शक्य आहे. जर पोलीस विभागात ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मोठ्या प्रमाणावर उपयोग सुरू झाला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे जाईल; शिवाय पैसा, वेळ यांचीदेखील बचत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.संशोधनावर भर देणार आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा वापर दिसून येतो. ‘फॉरेन्सिक सायन्स’मध्येदेखील याचा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे. साधारणत: गुन्हा जेथे घडला आहे तेथून फिंगरप्रिंट्स, रक्त इत्यादी बाबी गोळा करण्यात येतात व ‘फॉरेन्सिक सायन्स’च्या माध्यमातून याची तपासणी करण्यात येते. परंतु अनेकदा तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे यात अडथळे येतात. ‘नॅनो टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून यावर नक्कीच मात करता येऊ शकते. आपल्याकडे याच्या संशोधनावर भर देऊन त्याला प्रत्यक्ष वापरात आणण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सूक्ष्म पुराव्यांचे होऊ शकते परीक्षणआजच्या घडीला बहुतांश वेळा पोलीस विभागाकडून पुरावे गोळा करणे व त्याच्या परीक्षणासाठी ‘मायक्रो’ तंत्रज्ञानापर्यंत प्रामुख्याने वापर होतो. परंतु ‘फॉरेन्सिक सायन्स’मध्ये ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ची तपास व सखोल परीक्षणासाठी मोठी मदत होऊ शकते. अगदी सूक्ष्म कणांच्या आकाराचे पुरावेदेखील या माध्यमातून गोळा करता येऊ शकतात. तसेच यांचे परीक्षण होऊन या माध्यमातून चौकशीला दिशा मिळू शकते. ‘नॅनो पार्टिकल्स’च्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करुन बंदुकीच्या काडतुसातील कण, अस्पष्ट फिंगरप्रिंट्स यांना गोळा करता येऊ शकते. शिवाय ‘एएफएम’ (आॅटोमॅटिक फोर्सड् मायक्रोस्कोप) व ‘एसईएम’ (स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप) यांच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्म कणांचेदेखील अध्ययन करता येते.