अकोला येथील चिमुकलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण; तिसरा आरोपी फरारअकोला : जुने शहरातील १० वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणारा आणि तिला चौथ्या माळ्यावर जाण्यास सांगणारा या दोन आरोपींना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी २४ तासांच्या आतच अटक केलेल्या प्रवीण ऊर्फ पऱ्या प्रकाश साखरे आणि गोविंद परशुराम साखरे आरोपींना न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. टिळक रोडवरील शाळेत शिक्षण घेत असलेली दहा वर्षीय चिमुकली तिचे वडील आणि आजीसोबत जुने शहरात राहते. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ही मुलगी शाळा सुटल्यानंतर प्लास्टिक वेचण्याचे काम करते. शनिवारी शाळा आटोपल्यानंतर ती चिमुकली प्लास्टिक वेचण्याचे काम करीत असताना त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्स परिसरात गेली. या ठिकाणी तिला माळीपुरा येथील रहिवासी गोविंद परशुराम साखरे हा ५३ वर्षीय इसम भेटला. त्याने चिमुकलीला कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर जाण्यासाठी पैसे दिले. यासोबतच चौथ्या माळ्यावरही तुला पैसे मिळणार असल्याचे सांगितले. नासमज असलेली ही चिमुकली पैशांच्या मोहापायी चौथ्या माळ्यावर जाताच या ठिकाणी तिच्यावर प्रवीण ऊर्फ पऱ्या प्रकाश साखरे रा. माळीपुरा व त्याचा साथीदार या दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोन युवक मुलीवर तुटून पडत लचके तोडल्याने यामध्ये ही चिमुकली गंभीर जखमी झाली. या दोन नराधमांच्या अत्याचाराने रक्ताने माखलेली ही चिमुकली हळुवार आणि रडतच चौथ्या माळ्यावरून खाली उतरली. या ठिकाणच्या काही व्यापाऱ्यांना ती दिसताच काहीही बोलण्याच्या आधीच तिच्यासोबत घडलेला प्रकार ओळखला. तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. रविवारी दुपारी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याचे नावही अद्याप समोर आले असून, प्रवीण साखरे याच्याकडून त्याचे नाव घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.नराधमांवर कठोर कारवाईची मागणीया दोन नराधमांनी कोणतेही कारण नसताना चिमुकलीवर भयंकर अत्याचार केला. शारीरिक भूक भागविण्यासाठी हपापलेल्या दोन नराधमांच्या अत्याचाराला मुलगी बळी पडली. तिच्या आयुष्याची राखरांगोळी या दोघांमुळे झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.चिमुकलीची प्रकृती स्थिरपीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या शरीरावरील जखमी भरून काढण्यासाठी उपचार केले आहेत. शनिवारपेक्षा आराम असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
नराधमांना २४ तासांच्या आतच ठोकल्या बेड्या!
By admin | Published: April 17, 2017 1:25 AM