सिंधुदुर्ग - नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल वेगळीच प्रतिक्रिया दिला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही प्रस्ताव आला नाही. तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यानी असे कोणतेही विधान केले नाही. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. सावंतवाडी येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी चव्हाण म्हणाले, ''नारायण राणे काँग्रेस मध्ये येत आहेत अशी कुठलीही चर्चा नाही. तसेच बाळासाहेब थोरात यांनी नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.'' दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी नांदेड मध्ये चर्चा झाली होती.काँग्रेस बाबत प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले असेल तर दुर्दैवी आहे.आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे.त्यांनी ही चर्चेची तयारी दाखवावी,'' असे चव्हाण म्हणाले. तसेच राज्याला कर्जाच्या खाईत घालण्याचे काम या सरकारने केले आहे.केवळ कोट्यावधी रुपयांच्या घोषणा हे चुनावी जुमले आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये?... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 7:08 PM
नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र...
ठळक मुद्देनारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही प्रस्ताव आला नाही. तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यानी असे कोणतेही विधान केले नाही