मुंबई: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन नारायण राणे आणि शिवसेना आणनेसामने आले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. पण, आता त्या विधानाच्या तीन दिवसानंतर राणे नरमल्याचं दिसतं आहे.
मीडियाशी संवाद साधाना नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर स्वागत करू, असं म्हटलं आहे. तसेच, विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्न आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: मंत्री असताना बांधून पूर्ण केलं. आता हे विमानतळ 9 ऑक्टोबरला सुरू होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझं श्रेय लाटण्याचा जे कोण प्रयत्न करत आहे, त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं योगदान नाही, असंही ते म्हणाले.
सणांवर निर्बंध असू नयेतयावेळी राणेंनी सरकारकडून सणांवर घातलेल्या निर्बंधांवरही भाष्य केलं. फक्त हिंदू सणावर असे निर्बंध घालणं योग्य नाही. मी असले निर्बंध मानतच नाही. त्यांना काय करायचं ते करू देत, असं राणे म्हणाले. तसेच, गणरायाकडे राज्याच्या सुख समुद्धीचे साकडे घातल्याचंही ते म्हणाले.