Gulabro Patil slams Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशी जोरदार टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
नारायण राणे मंत्री असले तरी निर्णय मोदींनाच विचारून घ्यावे लागतील; एकनाथ शिंदे यांचा पलटवार
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असून ते लवकरच भाजपामध्ये येणार असल्याचं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलं होतं. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. "नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता निघाला आहे. आधी ते शिवसेनेत अस्वस्थ होते. मग ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघू उद्योग खातं मिळालं. त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे", असा खरमरीत टोला गुलाबराव यांनी राणेंना लगावला आहे.
राणेंचा अंदाज हवामान खात्यासारखा"एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे", असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी राणेंचा दावा फेटाळलाएकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून ते केवळ सहयांचेच मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास खात्यात किंवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा निर्वाळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. समाजमाध्यमांद्वारे त्यांनी आपली ही प्रतिक्रीया व्यक्ती केली.
नगरविकास खात्यात आणि कामात मातोश्रीवरुन कोणताही हस्तक्षेप नाही: एकनाथ शिंदे यांचा दावा
केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर नारायण राणे यांची सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. याच दरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असल्याचा आरोप करीत त्यांना आपण भाजपमध्ये घ्यायला तयार असल्याचेही राणे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मातोश्रीवरुन अर्थात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपाचा आरोप फेटाळून लावला.