शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नारायण राणे-रावल भेट! चर्चांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2017 2:22 PM

आज भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी राणेंची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 2 - नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या राजकीय भूमिकेबाबत अद्याप  संभ्रम असतानाच आज भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी राणेंची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र रावल आणि आपले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. काही झाले तरी मी भाजपात जाणार नाही. तसेच 4 एप्रिलला काँग्रेसच्या संघर्ष यात्रेतही सहभागी होणार असल्याचे सांगत नारायण राणे यांनी पक्षांतराच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू होत्या. भाजपा नेत्यांनीही राणेच्या पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक वक्तव्ये केल्याने तसेच राणेही काँग्रेसवर कठोर शब्दात प्रहार करत असल्याने राणे लवकरच भाजपावासी होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 
 राणेचे पुत्र नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राणेंच्या पक्षांतराच्या बातम्या थंडावल्या. पण आज राणे आणि रावल यांच्यात भेट झाल्याने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र स्वत: राणेंनीच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त स्पष्ट शब्दात फेटाळल्याने आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.