शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Narayan Rane: 'मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं'; नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 5:21 PM

Narayan Rane: शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राणे यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेचा काहीच संबंध नाही. उलट यांच्या नेत्यांनी विमानतळाच्या कामांना विरोध केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

"विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आमच्या सिंधुदुर्गात यावं, आम्ही त्यांचा पाहुणचार करू, मालवणचं म्हावरं खावं आणि परत जावं", असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. 

शिवसेनेचं कोकणच्या विकासात कोणतंही योगदान नाहीशिवसेनेचं एक योगदान कोकणात दाखवा, त्यांनी केलेलं एक काम मला दाखवा, असं आव्हान नारायण राणे यांनी यावेळी केलं. चिपी विमानतळ केव्हाच बांधून तयार होतं. पण विमानतळाच्या पाण्याचा प्रश्न होता. एमआयडीसीकडे पाणी देण्याचं काम होतं. ते इतकी वर्ष का केलं नाही? चिपी विमानतळाकडे पोहोचणाऱ्या रस्त्याचा खर्च फक्त ३४ कोटी इतका होता. मग तो इतकी वर्ष का केला गेला नाही?, असं सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केले. 

रस्त्यांची कामं घेतली आणि प्रत्यक्षात कामं केलीच नाहीत. त्या पैशातून फक्त नव्या नव्या गाड्या नेत्यांनी घेतल्या, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला. 

...तेव्हा विनायक राऊतांचं विमानतळाविरोधात आंदोलनसिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या होईल. १९९७-९८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी उड्डाण मंत्री असताना ग्रीनफिल्ड विमानतळांची घोषणा केली. तेव्हा सिंधुदुर्गात विमानतळ व्हावं यासाठी मी त्यांची भेट घेऊन विमानतळ मंजूर करून घेतला. १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन झालं. त्यावेळी तिथे काही जण आंदोलन करत होते. घोषणाबाजी सुरू होती. जमीन संपादित करू नका, आम्हाला विमानतळाची गरज नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांचं नेतृत्त्व शिवसेना खासदार विनायक राऊत करत होते. आता तेच विमानतळ आम्ही सुरू केलं म्हणत श्रेय घेत आहेत, असं राणेंनी सांगितलं.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChipi airportचिपी विमानतळ