सावंतवाडी : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदराआडून घेतले आहे.
त्यामुळे मी इशारा दिला म्हणजे, शिवसेनेत दोन मतप्रवाह असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फडणवीस व दरेकर हे जाणार असल्यानेच शिवसैनिकानी विरोध केला नाही. ते गप्प राहिले, असा युक्तीवाद शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
दोनच दिवसापूर्वी राऊत यांनी आपल्या सोशल मिडियावरून राणे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळांचे दर्शन शिवसैनिक घेऊ देणार नाही. बाटग्याना प्रवेश नाही, अशी टिका केली होती. त्यानंतर मात्र गुरूवारी राणे यांनी स्मृतीस्थळांचे दर्शन घेतले यावर राऊत यांनी खुलासा केला.
'साहेब तुम्ही आज हवे होतात..', नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळासमोर नतमस्तक
राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळांचे दर्शन हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पदरा आडून घेतले आहे. फडणवीस व दरेकर हे जाणार असल्यानेच शिवसेना गप्प राहिली. विरोध केला नाही. या दोघांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे, पण राणे यांनी तो केव्हाच गमवला आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद अशा बाटग्यांना कदापी मिळणार नाही, अेसे राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेत या विषयावरून दोन मते नसल्याचा खुलासा ही त्यांनी यावेळी केला.