ठाणे : चिपळूण काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पोलीस चौकशी सुरू झाली असून लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना दिली. याचदरम्यान, सावंत आणि राणे यांच्यात एका बंद खोलीत काही मिनिटे चर्चा झाली. यावेळी काय बोलणे झाले ते मात्र गुलदस्तातच आहे. बुधवारी ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या सावंत यांची भेट घेऊन राणे यांनी त्यांची विचारफूस केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेस प्रदेश सचिव बाळाकृष्ण पूर्णेकर,ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, राजेश जाधव आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सावंत यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने आपण त्यांच्या भेटीला आलो. त्यामुळे त्यांच्यामागे राणे परिवार पूर्णपणे उभे राहणार आहे. याचदरम्यान,पत्रकारांनी निलेश राणे यांनी सावंत यांच्याबद्दल केलेले उद्गाराबाबत विचारणा करताच, राणे यांनी सावधगिरी बाळगून त्या दोघांमध्ये गैरसमज झाले असल्याचे म्हटले. (प्रतिनिधी) >रुग्णालयात एकांतात भेटरुग्णालयात भेटीसाठी आलेल्या राणे यांनी सावंत यांच्याशी एका बंद खोली चर्चा केली. मात्र,त्यांच्यात काय चर्चा झाली हे गुलदस्तातच आहेत. यावेळी पत्रकारांना राणे यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या खोलीत जाण्यास मज्जाव केला. निलेश राणे यांना अटकपूर्व जामीनकाँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना बुधवारी रत्नागिरी न्यायालयाने ३ मेपर्यंत प्रत्येकी १५ हजारांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
नारायण राणेंनी घेतली सावंतांची भेट
By admin | Published: April 28, 2016 6:20 AM