पुणे, दि. 10 - कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारासोबतच नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे सांस्कृतिक सेवा पुरस्कार , नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार आणि नारायण सुर्वे सनद पुरस्कार अनुक्रमे डॉ. अभिजीत वैद्य, नागपूरचे कवी सुधाकर गायधनी, भाऊसाहेब भोईर, सुनिताराजे पवार आणि नितीन शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे.शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता एस.एम.जोशी सभागृहात ज्येष्ठ विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार वितरीत केले जातील. ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार मधुकर भावे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे संचालक अतुल गोतसुर्वे हे उपस्थित राहणार आहेत.याच समारंभात व्यसनमुक्ती कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले कामगार नेते बाळासाहेब बाणखेले आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या डॉ. आशुतोष गाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 7:31 PM