मुंबई : देशावरील कर्जामध्ये 71 टक्क्यांची वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
गेल्या साडे पाच वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा 71 टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप काँग्रेसेचे प्रवक्ते प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला होता. तसेच हा बोजा उतरवणार कसा, असा सवालही त्यांनी केला होता. मार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. कर्जात ३७.९ लाख कोटींची वाढ (७१.३६ टक्के) झाली. म्हणजेच प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ४१,२०० रुपयांवरून ६८,४०० रुपयांवर गेले. कर्ज प्रति माणशी २७,२०० रुपयांनी वाढले. साडेपाच वर्षांमध्ये प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ६६ टक्के म्हणजे दरवर्षी १०.३ टक्क्य़ांनी वाढले.
यावर थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे. या सरकारला कुठलेही धोरण वा दिशा नसल्यामुळे आर्थिक आणीबाणी ओढवली आहे. त्यातूनच कर्जाचा बोजा वाढला आहे. खरे तर मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
तसेच राहुल गांधी यांचेही ट्वीट त्यांनी रिट्विट केले आहे. आमच्या सरकारच्या काळात जीडीपी 7.5 टक्के, महागाई 3.5 टक्के होता. आता या उलट परिस्थिती मोदी सरकारने केली आहे. आता जीडीपी 3.5 टक्के आणि महागाई 7.5 टक्क्यांवर नेऊन ठेवली असून पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनाच पुढे काय करावे हे कळत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी पुन्हा येणार, काँग्रेसचे अध्यक्ष होणार; रिलॉन्चची जोरदार तयारी
आर्थिक मंदीचा फटका, सीमारेषेवरील जवानांना 2 महिन्यांचा भत्ता मिळेना
धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीयकृत बँकांमध्येच अधिक घोटाळे