"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:33 PM2024-07-06T15:33:40+5:302024-07-06T15:34:31+5:30

Nana Patole Criticize Narendra Modi: मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

"Narendra Modi is the leader of the corrupt people in the country, the vicar is also clean from BJP's washing machine", Nana Patole's criticism  | "नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 

"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 

मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
  
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलीसच सुरक्षित नाहीत ही परिस्थीती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना फाईव्हस्टार व्यवस्था दिली जाते. प्रशासन व पोलीस कुठे आहे हे कळत नाही. नागपूरमध्येही राम झुलावर मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली, ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भिती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिम्मत होते असे पटोले म्हणाले. 

दीक्षाभूमीशी कोट्यवधी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. सरकार काही बांधकाम करत असेल आणि आस्था व जनभावनेला धक्का लागत असेल तर विरोध होणारच. जनभावना व आस्था यांचा ताळमेळ ठेवून काम करावे, पण सरकार आस्था व जनभावनेला किंमत देत नाही. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे पुतळे या सरकारने हटवून एका कोप-यात बसवले. हे सरकार दिशाभूमीत काही चांगले करेल यावर लोकांचा विश्वासच म्हणून तो जनप्रक्षोभ आपल्याला दिसून आला. मन की बात करणारे सरकार असल्याने जनतेच्या श्रद्धा, जनभावनेला कुठलीची किंमत नाही. दिक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे, भाजपची कार्यपद्धती ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’ हीच आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

Web Title: "Narendra Modi is the leader of the corrupt people in the country, the vicar is also clean from BJP's washing machine", Nana Patole's criticism 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.