पुणे : दिल्लीतील विधानासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शनिवारी घेतलेल्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोग्य वक्तव्य करून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालविली. पंतप्रधानपदावरील एक माणूस खालच्या प्रतींची वक्तव्य करतो, हे खरोखरच लज्जास्पद आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी रविवारी येथे केला.ह्यआपह्णच्यावतीने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी पाषाण येथे मेळावा घेण्यात आला़ यावेळी योगेंद्र यादव उपस्थित होते. यादव म्हणाले, भाजपाने दिल्लीत घेतलेल्या मेळाव्यात दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकाही राजकारणी व्यक्तीला समोर आणले नाही. त्यांनी केवळ वेंकय्या नायडू यांची प्रशंसा केली. नायडू दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणार आहेत का, हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. दिल्लीत निवडणुकीला उशीर करण्यासाठी मोदी ‘आप’ला कारणीभूत ठरवत आहेत. मात्र प्रत्यक्षात दिल्लीत लवकर निवडणुका घेतल्या असत्या तर त्यात आप निवडून आला असता, अशी त्यांना भीती होती. आताही निवडणुकांमध्ये ‘आप’लाच बहुमत मिळेल, हे तेथील सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे. दिल्लीचा विकास करण्याची भाषा मोदी करतात. मग इतर राज्यांप्रमाणे दिल्लीला सर्व गोष्टींमध्ये स्वायत्तता का दिली जात नाही. ‘आप’ अनेक वर्षांपासून याची मागणी करीत आहे. भाजपा सरकारने भूमीअधिग्रहण कायदा आणून शेतकरी व आदिवासींचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली
By admin | Published: January 12, 2015 3:15 AM