पिंपरी : नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी गांधी शांती यात्रा सुरु केली आहे. महात्मा गांधीजींचे आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून गांधी शांती यात्रा सुरु केली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा सरकारने आणला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. मुंबई येथून निघालेल्या यात्रेचे स्वागत निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, निगार बारसकर, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, सुनील शिंदे, सुनील शिर्के, देवानंद बांदल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.यशवंत सिन्हा म्हणाले, जेएनयूमधील झालेल्या हिंसक घटनेबाबत देशभर विद्यार्थी व युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारच्या मनमानी कारभाराविरूद्ध युवकांनी आवाज उठविलाच पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना संघटीत करून शांततेच्या मागार्ने ही यात्रा जनजागृती करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना सुरुवातीला काही अडचणी जरूर आल्या. परंतू आता सरकारचे कामकाज सुरळीतपणे सुरु आहे. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल.
आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी : यशवंत सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 7:40 PM
नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा
ठळक मुद्देदेशातील सामाजिक सलोखा बिघडला : पृथ्वीराज चव्हाणआर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत:अपयशी