शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 9:53 AM

युतीची घोषणा करून जागावाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मुंबई - युतीची घोषणा करून जागावाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीकडून प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही राज्यात आठ प्रचारसभा होणार आहेत. तसेच मुंबईत होणाऱ्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकेच्या फैरी झडत होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असतानाच दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युतीची गोळाबेरीज जमवली. तसेच अपवाद वगळता दोन्ही पक्षांचे जागावाटपही सुरळीतपणे पार पडले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी प्रचाराकडे लक्ष केंद्रित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर युतीच्या प्रचाराची धुरा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ प्रचार सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा येथे होणार आहे. तर मोदींची शेवटची प्रचारसभा मुंबईत होणार आहे. या सभेत नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसेच संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना