शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

'सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध आडम मास्तर', मार्क्सवादीचे 4 उमेदवार घोषित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:24 PM

मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि सोलापूर मध्यचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पक्षाच्या 4 विधानसभा उमेवारांची घोषणा केली.

मुंबई - गेल्या पाच वर्षांत भाजप-प्रणित केंद्र व राज्य सरकारने आपल्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध आणि हुकूमशाही धोरणांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांचे जीवन उध्वस्त केले आहे, असे म्हणत भाजपा सरकारविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. पक्षाचे राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य कॉ. नरसय्या आडम यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. 

मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि सोलापूर मध्यचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पक्षाच्या 4 विधानसभा उमेवारांची घोषणा केली. त्यानुसार, ते स्वत: सोलापूर मध्यमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने रविवारी पहिल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आता, मास्तर म्हणून परिचित असलेले नरसय्या आडम यांचं आव्हान प्रणिती शिंदेंना असणार आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार१. सोलापूर मध्य - कॉ. नरसय्या आडम२. कळवण (अ.ज.) - कॉ. आ. जे. पी. गावीत३. नाशिक पश्चिम - कॉ. डॉ. डी. एल. कराड४. डहाणू (अ.ज.) - कॉ. विनोद निकोले

या निवडणुकीत माकपची तीन उद्दिष्टे आहेत:

● भाजप-शिवसेना युतीचा पराभव करणे.● माकप व इतर डाव्या पक्षांची ताकद वाढविणे.● राज्यात धर्मनिरपेक्ष सरकारची स्थापना करणे. 

सध्याचे अभूतपूर्व आर्थिक संकट, गेल्या पाच दशकातील परिसीमा गाठलेली बेरोजगारी, आपल्या राज्यात देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, संपूर्ण कर्जमाफी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या आश्वासनाला फासलेला हरताळ, दक्षिण महाराष्ट्रातील व मुंबई-पुण्यातील महापूर आणि मराठवाडा-विदर्भातील दुष्काळ हाताळण्यात सिद्ध झालेली राज्य सरकारची दिवाळखोरी, कामगारवर्गावर सर्व प्रकारे केलेले हल्ले, मनरेगावरील खर्च कमी करून शेतमजुरांवर आणलेली संक्रात, आदिवासींच्या वनाधिकारावर आणलेली गदा व त्या भागातील कुपोषणामुळे वाढत असलेले बालमृत्यू, महिला, दलित व अल्पसंख्याकांवर वाढते हल्ले, सरकारी संस्थांचा सूडबुद्धीने गैरवापर करून लक्ष्य केलेले अथवा वश करून घेतलेले विरोधी पक्षांचे अनेक नेते, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या कटाच्या सूत्रधारांना पकडण्यात आलेले अपयश, भीमा कोरेगावची दंगल पेटवणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना मोकाट सोडून निरपराध लोकांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र, जनतेची उपजीविका, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व भारतीय संविधान या सर्वांवर केलेले आघात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अभिप्रेत असलेला महाराष्ट्राचा समान, समतोल आणि सर्वांगीण विकास असे प्रमुख मुद्दे या निवडणूक प्रचारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यभर प्रभावीपणे मांडणार आहे.  

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूरsolapur-city-central-acसोलापूर सिटी सेंटरvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Narsayya Adamनरसय्या आडम