नाशिक : काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पूर्णत: निवळल्याने शहराच्या किमान तपमानाचा पारा शनिवारी राज्यात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला. नाशिकखालोखाल शनिवारी नागपूर व गोंदियात (१३.१) नीचांकी तपमानाची नोंद झाली. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी नाशिकमध्ये थंडी पडण्यास प्रारंभ झाला होता. २० नोव्हेंबरला शहरात मोसमातील नीचांकी तपमानाची नोंद (११.५) झाली होती; मात्र आग्नेय व पूर्व मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह शहराला पावसाने झोडपून काढले होते. ढगाळ वातावरणामुळे शहराचा पारा वाढला होता. आता हे वातावरण पूर्णत: निवळल्याने पुन्हा तपमान घटण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत पाऱ्यात तब्बल पाच अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. (प्रतिनिधी)
नाशिक गारठले!
By admin | Published: December 06, 2015 2:03 AM