नाशिक, कल्याणमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गटाला धक्का; माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:37 PM2024-08-08T20:37:07+5:302024-08-08T20:38:34+5:30

Congress News: नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nashik, BJP in Kalyan, Shiv Sena shock Shinde group; Entry of former corporators and office bearers into Congress  | नाशिक, कल्याणमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गटाला धक्का; माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

नाशिक, कल्याणमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गटाला धक्का; माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लीम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीमधील राकेश मुथा यांच्यासह पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

“मागील १० वर्षात महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची किड लागली आहे, लोकशाही व संविधानाला न जुमानता ते काम करत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्थ केले आहे. आता भाजपा नावाची ही किड सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ज्या उद्देशाने या सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचा उद्देश विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

Web Title: Nashik, BJP in Kalyan, Shiv Sena shock Shinde group; Entry of former corporators and office bearers into Congress 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.