शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:12 PM

नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला. तर ही भाजपाचीच खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं. 

त्यात आता सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुलाला अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा घेणार म्हटलं आहे. हा एकप्रकारे विश्वासघात आहे. हायकमांडला आम्ही सगळे कळवले आहे. त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करू. काँग्रेस बंडखोराला पाठिंबा देणार नाही. सगळं ठरलेला कार्यक्रम होता. भाजपाने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतेय. भाजपा भय दाखवून घरं तोडण्याची कामे करतंय. भाजपाला त्याचा आनंद होतोय. ज्यादिवशी भाजपाचं घर फुटेल तेव्हा इतरांची घरे फुटण्याचं दु:ख कळेल असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे. 

बाळासाहेब थोरात दुपारपर्यंत संपर्कात होते, पण आता...; दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर बाळासाहेब थोरात संपर्कात होते का अशी विचारणा पत्रकारांनी नाना पटोलेंना केली. तेव्हा काल दुपारपर्यंत ते संपर्कात होते. पण त्यानंतर संपर्कात नाही असंही स्पष्ट केले आहे. 

...तर सरकारला जाब विचारूराज्यात MPSC परीक्षांसाठी मुलांनी मागील ३-४ वर्षापासून तयारी केल्यात. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होतील असं शासनानं ठरवले. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसनं विधानसभेतही केली आहे. २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करावा. राज्य शासनाकडून जो अन्याय सुरू आहे त्याचा निषेध करतो. विद्यार्थ्यांनी जे राज्यव्यापी आंदोलन उभारलं आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार जर गरीब मुलांचे ऐकत नसेल तर काँग्रेस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा