शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Nashik Graduates Constituency Election : तांबे पिता-पुत्रांवर पक्षाकडून कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 6:20 PM

Nashik Graduates Constituency Election : आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरुन मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

नाशिक : सध्या महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यादरम्यान, नाशिक (Nashik MLC Election 2023) मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विट पाहायला मिळाला. नाशिक पदवीधर विधान परिषदेसाठी काँग्रेसनं पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाकडून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंना (Nana Patole) सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर पटोले म्हणाले की, 'मी सुधीर तांबेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली. त्यांच माझ्याशी कुठलंही बोलणं झालेलं नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच स्पष्ट बोलेन. तांबे पिता-पुत्रांनी पक्षाला (Congress) अंधारात ठेवून निर्णय घेतला का? याचीही माहिती घेऊ. बाकी, भारतीय जनता पक्षाची लोकं काहीही बोलू शकतात. त्यामुळं मी तुम्हाला सगळी माहिती घेऊन वेळेवर प्रतिक्रिया देईन', अशी टीका त्यांनी केली.

पटोले पुढे म्हणतात की, 'सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म (Independent Candidate) भरल्याचं सांगताय. पण, आमचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांची काय भूमिका होती, त्यांची काय परिस्थिती होती या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. तिथे आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते, त्यामुळं नेमकं काय झालं, याची माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ. बाकी जी घटना घडली, ती योग्य नाही', असंही नाना पटोले म्हणाले.

आज नेमकं काय घडलं?नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी जागा सोडली. यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली आणि आज अर्ज भरण्यासाठी त्यांना एबी फॉर्मही दिला. पण, उमेदवारी अर्ज भरायला गेल्यानंतर ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांच्या नावाचा एबी फॉर्म आलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिकNana Patoleनाना पटोलेElectionनिवडणूक