नाशिक : ‘अवघा महराष्ट फुटबॉल’मय अंतर्गत खेळाच्या तासिकेसाठी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील प्राथमिक जनता विद्यालयाच्या प्रारंगणात खेळताना भोवळ येऊन सहावीच्या वर्गात शिकणारी तेजश्री कोसळली. यामुळे तीची प्रकृती बिघडली शिक्षकांनी पालकांना कळवून तत्काळ तिला रुग्णालयात हलविले; मात्र मेंदूला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीत बिघाड झाल्यामुळे ती काही तासानंतर ‘कोमा’मध्ये गेली. मंगळवारी डॉक्टरांनी तीला मेंदू मृत घोषित केले. तेजश्री रमेश शेळके (११) असे शाळकरी मुलीचे नाव आहे. तिचे वडील, आजोबा व चुलत्यांनी तीने जग बघावे, या उदात्त उद्देशाने अवयवदान करण्याचा निर्णय डॉक्टरांना स्वयंस्फूर्तीने बोलून दाखविला. ‘समृध्दी’बाधित शिवडे गावाचे शेतकरी शेळके कुटुंबियांचा हा निर्णय चौघांना नव आयुष्य व दोघादृष्टीबाधितांना दृष्टी देऊन जाणारा ठरला आहे. तेजश्रीचे हृदय ग्रीन कॉरिडोर’द्वारे मुंबईला तर यकृत पुणे आणि एक मुत्रपिंड सोलापूरला बुधवारी रवाना झाले.
नाशिकच्या बालिकेचे हृदय धडधडणार मुंबईत तर पुणे, नाशिकमध्येही थांबणार तीघांचा मृत्यूशी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:19 PM
नाशिक : ‘अवघा महराष्ट फुटबॉल’मय अंतर्गत खेळाच्या तासिकेसाठी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील प्राथमिक जनता विद्यालयाच्या प्रारंगणात खेळताना भोवळ येऊन सहावीच्या वर्गात शिकणारी तेजश्री कोसळली. यामुळे तीची प्रकृती बिघडली शिक्षकांनी पालकांना कळवून तत्काळ तिला रुग्णालयात हलविले; मात्र मेंदूला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीत बिघाड झाल्यामुळे ती काही तासानंतर ‘कोमा’मध्ये गेली. मंगळवारी डॉक्टरांनी तीला ...
ठळक मुद्दे ‘समृध्दी’बाधित शिवडे गावाचे शेतकरी शेळके कुटुंबियांचा हा निर्णय चौघांना नव आयुष्य व दोघादृष्टीबाधितांना दृष्टी देऊन जाणारा ठरला अवयवदान करण्याचा निर्णय डॉक्टरांना स्वयंस्फूर्तीने बोलून दाखविला.‘ग्रीन कॉरिडोर’साठी नाशिक शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सहकार्य तेजश्रीचे हृदय ग्रीन कॉरिडोर’द्वारे मुंबईला तर यकृत पुणे आणि एक मुत्रपिंड सोलापूरला बुधवारी रवाना