नाशिक : ‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल रविवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने वाजला. ८ आॅक्टोबर रोजी होणाºया या स्पर्धेची रंगीत तालीम अर्थात ‘प्रोमो-रन’मध्ये हजारो नाशिककर अबालवृध्दांनी उत्सफूर्त धाव स्वत:साठी घेतली.सकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून प्रथम दहा कि.मी.च्या प्रामो रनला प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. इ वायूनंदन, लोकमतचे मार्केटिंग डायरेक्टर करण दर्डा, सौ. रुचिरा दर्डा, सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, रवींद्र सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर पाच कि.मीच्या प्रोमो-रन’साठी धावपटूंनी धाव घेतली. तत्पुर्वी नाशिककरांनी ‘झुम्बा’ नृत्यामध्ये सहभागी होऊन स्पर्धेसाठी ‘वॉर्मअप’ के ले. पहाटे पाच वाजेपासूनच अनंत कान्हेरे मैदानाचा परिसर गजबजला होता. संगीताच्या तालावर थिरकत नाशिककरांनी स्वत:ला प्रोमो-रनसाठी पर्यायाने महामॅरेथॉन करिता सज्ज केले. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर अंतरावर ‘नाशिक ढोल’च्या वादकांनी पारंपरिक पध्दतीने ढोल-ताशा वादन करीत धावपटूंचा उत्साह वाढविला. तसेच धावपटूंच्या मार्गावर ठिकठिकाणी चिअरअप करण्यासाठी डान्सर कलावंतही आपला कलाविष्कार दाखवत प्रोत्साहित करत होते. या प्रोमो-रनमध्ये विविध मान्यवरांसह सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे.
असा आहे ५ कि.मीचा मार्गगोल्फ क्लब मैदान, धामणकर चौक, मायको सर्कल, जलसिंचन भवन, शासकिय वसाहत, उंटवाडी सिग्नल, ठक्कर डोम, एबीबी सर्कल ला वळसा घालून त्र्यंबकरोडने सिब्बल हॉटेल, यामाहा शोरुम, वनविभाग कार्यालयमार्गे मायको सर्कलवरून धामणकर चौकातून सर्व धावपटू फिनिश लाईन गोल्फ क्लब (देशदूत सर्कल) येथे पोहचणार आहे.असा आहे १० कि.मी.चा मार्गगोल्फ क्लब येथून त्र्यंबक रस्त्याने प्रोमो रन ला सुरूवात. धामणकर चौक, मायको सर्क ल, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल, महिंद्र सर्कलला वळसा घालून दुसºया बाजूने त्र्यंबक रोडने गोल्फ क्लबच्या फिनिश लाईनवर पोहचतील.
सुसज्ज व्यवस्थेमुळे समाधानमहामॅरेथॉनच्या धर्तीवर प्रोमो-रनकरिता ‘लोकमत’च्या वतीने सुसज्ज व्यवस्था व उत्तम नियोजन करण्यात आल्याने धावपटूंमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. पाच व दहा कि.मीच्या मार्गाला जोडणारे सर्व उपनगरीय रस्ते बॅरेकेडिंग करुन बंद करण्यात आले होते. तसेच रस्त्यावर दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते. प्रत्येक किलोमीटरवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. सर्व नियुक्त स्वयंसेवक धावपटूंना एनर्जी ड्रिंकसह पाण्याची बॉटल हातात ‘रेडी’ करुन देत होते.
वैद्यकिय खबरदारीधावपटूंचे आरोग्यासह वैद्यकिय खबरदारी घेण्यात आली होती. दोन्ही मार्गांवर कार्डियाक अॅम्ब्युलन्स फिरतीवर होती. या रुग्णवाहिकेच्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या फ्रिक्वेन्सी क्रमांक १सोबत स्वयंसेवकांच्या वॉकी-टॉकी कनेक्ट होत्या. याबरोबरच फिजिओथेरपिस्टची टीमही उपलब्ध करून देण्यात आली होती.