Nashik MLC Election : सध्या महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यातच, नाशिक (Nashik MLC Election 2023) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विट पाहायला मिळाला. पदवीधरसाठी काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, ऐनवेळी सुधीर तांबेंऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला. यानंतर एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटानं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. ऐनवेळी काँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी माघार घेऊन काँग्रेसला धक्का दिला. यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, याला भाजपचा मास्टरस्ट्रोक म्हटले जात आहे. या घडामोडीनंतर महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आली. त्यांनी आज अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, शुभांगी पाटील पूर्वी भाजपात होत्या, पण भाजपचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यानंतर शुभांगी पाटील यांनी थेट मातोश्रीशी संपर्क साधला आणि आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली. या बैठकीतच शुभांगी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.