नाशिक : शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.बहुसदस्सीय प्रभाग पध्दतीनुसार यंदाची पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान होत आहे. ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शहरात एकूण १० लाख ७३ हजार ४०७ मतदार असून त्यापैकी पाच लाख ७० हजार ६९९ पुरूष व पाच लाख दोन हजार ६३६ महिला आहेत. १ हजार ४०७ केंद्रांवरील विविध बुथवर या निवडणूकीचे मतदान घेतले जात आहेत. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी सुमारे ७ हजार ७४५ कर्मचारी व ४ हजार ५७८ मतदान यंत्रे (इव्हीएम) आहेत. शहरात एकूण २७९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले असून शहरातील काही केंद्रांबाहेर रांगा तर काही केंद्रांवर शुकशुकाट जाणवत आहे. गावठाण परिसरातील काही मतदान केंद्रे ओस असून सुशिक्षित उच्चभ्रू वसाहतींमधील काही केंद्रांवर रांगा लागल्या आहेत.
नाशिकमध्ये पाच तासांत १९ टक्के मतदान
By admin | Published: February 21, 2017 12:43 PM