नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि दगडफेकीचे प्रकार सोमवारी बहुतांश ठिकाणी थांबले. त्यामुळे तणाव निवळला असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. १५ दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.मुंबई-आग्रा महामार्गही सुरळीत झाला. जिल्ह्याचा ग्रामीण भाग वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी बहुतांश शाळा, महाविद्यालये, तसेच बससेवा बंद ठेवण्यात आली होती. आंदोलकांच्या दगडफेकीत ३५ पोलीस जखमी झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात बंद पाळून मूक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातही काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नगर जिल्ह्यात अहमदनगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको केला. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाशिक पूर्वपदावर
By admin | Published: October 11, 2016 6:17 AM