शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

By admin | Published: March 17, 2017 2:58 PM

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 17 - धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 मार्च) नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 
 
रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरेक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच डाँक्टरांनी बंद पुकारला आहे. आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशाराही देण्यात आला आहे.  
 
(मासबंकमधून मार्डची माघार)
दरम्यान, धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टराला झालेल्या मारहाण प्रकरणी राज्यभरातील ४ हजारहून अधिक निवासी डॉक्टर शुक्रवारी मासबंक करणार होते. मात्र हा राज्यव्यापी ‘मासबंक’ गुरुवारी रात्री उशिरा मागे घेण्यात असून शुक्रवारी केवळ इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रकरणी आझाद मैदान येथे निदर्शने करणार आहेत.
 
गेल्या २ वर्षात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या ४५ घटनांची नोंद झाली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये पोलीसांमध्ये तक्रार दाखल करुनही निकाल न लागल्याने डॉक्टरांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्या, तक्रारींसाठी राज्यव्यापी मासंबक करण्यात येणार होता.
 
याविषयी, मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले की न्यायालयाच्या निर्णयामुळे मासबंक मागे घेतला आहे. मासबंकचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये,याकरिता ही भूमिका घेण्यात आली आहे. काळ्या फिती लावून निवासी डॉक्टर निदर्शने करणार असून मार्डची पुढील भूमिका चर्चा करुन ठरविण्यात येईल.
(डॉक्टरांचा स्वरक्षणासाठी एल्गार)
तर दुसरीकडे, धुळ्यातील डॉक्टरवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजूट केली आहे. स्वरक्षणासाठी एल्गार पुकारत असे प्रकार तातडीने रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन शासनाला करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करीत तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी डॉक्टरांकडून निषेध रॅली काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आली होती.धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन म्हामुनकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केला. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.