मुंबई : नाशिक शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेसह तपास यंत्रणांनी अटकेची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत मुंबईतून तिघांना तर अजमेरमधून एकाला अटक केली आहे. यापैकी दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. येत्या काही दिवसांत आणखीन बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नाशिक शस्त्रसाठा प्रकरणात नाशिक पोलिसांनी शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७), सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडे (२३) यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या चौकशीतून मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांची नावे समोर येत आहेत.या प्रकरणी बोलेरो गाडी चोरी प्रकरणाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी नाशिक पोलिसांनी शिवडीतून ताब्यात घेतलेल्या अमीर रफिक शेख उर्फ लंगडाला अटक केली. अमीरने बोलेरोमध्ये चोरकप्पे तयार केले, तर कामाठीपुरा येथून मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या सलमान अन्वर कुरेशीलाही आता अटक करण्यात आली आहे.मंगळवारी या दोघांच्या अटकेपाठोपाठ चेंबूरमधून संजय साळुंखेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिघेही उत्तर प्रदेशातील शस्त्रसाठ्याच्या गोदामापर्यंत गेले असल्याची माहिती तपासात समोर आली. मंगळवारी न्यायालयाने कुरेशीला २८ तर साळुंखेला २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीसुनावली.तिघेही अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. यापैकी आमीर हा पाशाच्या जवळचा होता. त्याचा नंबरकारी म्हणून त्याची ओळख आहे. या आरोपींच्या अटकेपाठोपाठ अजमेरमधूनही एकाला अटक करण्यात आली आहे, तोही मुंबईचाच रहिवासी असल्याचे समजते. अन्य पाहिजे गुन्हेगारांच्या शोधासाठी नाशिक आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक मुंबईसह ठिकठिकाणी रवाना झाले आहेत.देवेन भारतींची पोलीस ठाण्याला अचानक भेटशिवडीतील पाशाच्या सहभागानंतर कायदा व सुव्यवस्थेच सहआयुक्त देवेने भारती यांनी मंगळवारी अचानक आरएके मार्ग पोलीस ठाणे गाठून चौकशी केली. त्यांना पाहून पोलीस अधिकाºयांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी येथील वरिष्ठांना खडसावल्याचे समजते.
नाशिक शस्त्रसाठा: अटकेची कारवाई सुरू, मुंबई, अजमेरमधून चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:35 AM