नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी बाहेर काढल्याने ते बचावल़े दरम्यान, पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले असले तरी यामध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीतील शासकीय धान्य गुदाम परिसरातील प्लॉट नंबर डी - ६३ मध्ये अशोक नरहर ब्राह्मणकर (रा़ समर्थनगर, नाशिक) यांची नीरज थर्माकोल अॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे़ कंपनीत थर्माकोलचे उत्पादन केले जात असून, रविवारी २० कामगार काम करीत होते़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक या कंपनीला भीषण आग लागली़ थर्माकोल हे ज्वालाग्राही असल्याने अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले होते़ या घटनेची माहिती काही नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास दिली़आग लागली तेव्हा कंपनीच्या दुसºया मजल्यावर वीस कामगार काम करीत होते़ यापैकी काही कामगारांनी गॅलरीतून उड्या टाकल्या, तर काहींना कंपनीच्या आजूबाजूकडील कंपनीतील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते धनंजय दातीर, सचिन दातीर, बाळासाहेब दोंदे, जनार्दन दातीर व अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले़ सिडको, सातपूर, शिंगाडा तलाव, के.के.वाघ महाविद्यालयाजवळील अग्निशमन केंद्र व महिंद्रा येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी यामध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, या आगीच्या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
अंबडच्या नीरज थर्माकोलला भीषण आग : लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:21 PM
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी बाहेर काढल्याने ते बचावल़े दरम्यान, पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांच्या ...
ठळक मुद्दे सायंकाळच्या सुमारास भीषण आग२० कामगार बचावल़े