नाशिक : चोरी-छुप्या पद्धतीने गांजाची विक्री सुरू असलेल्या जुने नाशिकमधील बागवानपुऱ्यात भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़२७) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणच्या एका घरातून तब्बल सव्वा पाच किलो गांजा जप्त करण्यात आला असून संशयित शेख फारू ख मोहम्मद युसुफ (३८, रा़घर नंबर ३०८०,शिररसाठ हॉटेलच्या मागे, शालिमार, बागवानपुरा, जुने नाशिक) यास अटक केली आहे़
बागवानपुरा परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती भद्रकालीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती़ त्यानुसार सूर्यवंशी यांनी आपले अधिकारी व कर्मचा-यांसह वरीष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनमोल केदार, विशाल मुळे, सुनील कासर्ले, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर लवांड, पोलीस हवालदार रियाज शेख, पोलीस नाईक कैलास शिंदे, शेरखान पठाण, यतीन पवार, मिलिंदसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब चत्तर, मनिषा सोनवणे, पूजा गवारे यांनी संशयित शेख फारू ख मोहम्मद युसुफच्या घरावर मंगळवारी दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित शेखच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून ५२ हजार रुपये किमतीचा ५ किलो १६२ ग्रॅम गांजा आढळून आला़
या प्रकरणी पोलीस हवालदार सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित शेख विरोधात गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़