ठळक मुद्दे पाच वर्षांपासून स्पेअरपार्टची चोरी प्रमुख संशयित चौधरी फरार
नाशिक : डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले व सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत तयार होणाºया स्पेअरपार्टमधील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ कंपनीतील भंगार माल घेणाºया ठेकेदारानेच फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून सिडकोतील पंडितनगरमधील तीन मजली इमारतीत फॉल्टी स्पेअरपार्टपासून बनावट स्पेअरपार्ट तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता़ अंबड पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ११ कोटी रुपयांचे बनावट स्पेअरपार्ट्ससह दोन संशयितांना अटक केली असून, प्रमुख संशयित फरार झाला आहे़ दरम्यान, या प्रकरणात कंपनीतील अधिकारी वा कर्मचाºयांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश या कंपनीत डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले नोझल्स, निडल्स, वॉल्व्ह सेट, वॉल्व्ह पीस, वॉल्व्हर पिस्टन व आदी सुटे भाग तयार केले जातात़ कंपनीतील चांगल्या तसेच फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून सिडकोतील पंडितनगरमध्ये कंपनीसारखेच बनावट पार्ट तयार करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती़ या माहितीची खात्री पटताच १ जानेवारी २०१८ रोजी बॉश कंपनीच्या अधिकाºयांना सोबत घेत पोलिसांनी पंडितनगरमधील या तीन मजली कारखान्यावर छापा मारला़यावेळी संशयित शिश अहमद अस्लम हुसेन खान (२१, रा. केवळ पार्क, अंबड-लिंक रोड) व अहमद रजा शुभराजी खान (१८, रा. संजीवनगर, अंबड-सातपूर लिंक रोड मूळ राहणार कोहरगडी, जि. बल्लारापूर, उत्तर प्रदेश) व आणखी एक संशयित हे आयशर ट्रकमध्ये बॉश कंपनीचे सुटे स्पेअरपार्ट बॅरलमध्ये भरून ठेवत होते़ या तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी हे स्पेअरपार्ट बॉश कंपनीतून चोरी करून आणले असून, ते सिडकोतील चौथी स्कीम पंडितनगर येथील एन-४१/ बीबी २,३/१५ येथे लपवून ठेवत असल्याचे तसेच हुबेहूब कंपनीसारखे बनावट स्पेअरपार्ट तयार करून त्यांची बॉश कंपनीचे ओरिजनल पार्ट असल्याचे सांगून विक्री करीत असल्याची माहिती दिली़अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुजीत मुंढे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाºयांनी या इमारतीतून बॉश कंपनीचे नोझल, निडल्स, वॉल्व्ह सेट, वॉल्व्ह पीस, वॉल्व्हर पिस्टन व सुटे भाग मिळून एकूण १० कोटी ६६ लाख रुपये किमतीचे २३ टन वजनाचे सुटे भाग जप्त केले असून, त्यामध्ये आयशर ट्रक व टाटा एस या दोन वाहनांचाही समावेश आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित शिश खान व अहमद खान या दोघांना अटक केली असून फसवणूक, चोरी व कॉपी राईट अॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी पोलीस उपआयुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, बॉश कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक रोहन तांदळे, सुरक्षा अधिकारी विजय काकड आदी उपस्थित होते़प्रमुख संशयित चौधरी फरारबॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका हा संशयित छोटू चौधरी याने घेतला असून, तो कंपनीतील भंगार उचलताना बॅरेलमध्ये फॉल्टी असलेले सुटे स्पेअरपार्ट टाकून चोरी करायचा़ सिडकोतील पंडितनगरमधील तीन मजली इमारतीत चोरी केलेला माल आणून त्यावर फिनिशिंग करून बॉश कंपनीचा ओरिजनल माल असल्याचे सांगत नाशिक, दिल्ली व पंजाबमध्ये विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे़ बनावट स्पेअरपार्ट प्रकरणी कंपनीने दिल्लीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे़ दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित छोटू चौधरी हा फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत़पाच वर्षांपासून स्पेअरपार्टची चोरी२०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत कंपनीतून स्पेअरपार्ट चोरीच्या सुमारे चार घटना घडल्या आहेत़ कंपनीस संबंधित विभागाने वेळोवेळी दिलेल्या माहितीनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन संशयितांना अटकही करण्यात आली होती़ दरम्यान, आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या स्पेअरपार्टची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़चौकशी सुरूबॉश कंपनीतील हे पार्ट केवळ नाशिकमधील कंपनीतच तयार केले जात असून, कंपनीतून कशाप्रकारे चोरी केली जात होती याची चौकशी सुरू आहे़ कंपनीचा बनावट माल हा परराज्यातही विक्री करण्यात आला असून, यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे़ यातील प्रमुख संशयिताच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत़- रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक