शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 8:47 PM

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़

ठळक मुद्देबॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरण ; आणखी एका संशयितास अटक शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी ; भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांचीही चौकशी

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयितास बुधवारी (दि़१०) अटक केली़ या गुन्ह्यात अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता यातील दोघांना न्यायालयीन कोठडी तर प्रमुख संशयित छोटू चौधरी व त्याच्या भावास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन तास चौकशी करून जबाब नोंदविले़ तर भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवक पुत्र सचिन राणे यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़

बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका घेतलेला प्रमुख संशयित छोटू चौधरी याने कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून त्यातील डिफेक्टिव्ह पार्ट रिपेअर करण्यासाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये तीनमजली इमारतीत कारखानाच सुरू केला होता़ बॉश कंपनीचे हे स्पेअरपार्ट तो विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक करीत होता़ ३१ डिसेंबर २०१७ ला स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर याची चर्चा होऊन ती पोलीस व राजकीय पुढाºयांपर्यंत पोहोचली़ यानंतर अंबडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य दोन पोलीस कर्मचारी व राजकीय पुढाºयांनी हजेरी लावून यामध्ये स्वत:चे हात ओले करून घेतल्याची चर्चा आहे़

बॉश कंपनीतील हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होऊन आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले गेले़ मात्र, एकमेकांवरील राजकीय राग काढण्यासाठी आलेली ही आयतीच संधी दवडण्यासाठी कोणीही तयार नसल्याने हे प्रकरण पोलिसात गेले़ विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला प्रकरण उजेडात येऊनही पोलिसांनी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल केला व ११ कोटी रुपयांचे बॉश कंपनीचे स्पेअरपार्ट जप्त केल्याची माहिती दिली़ या प्रकरणात पोलिसांनी प्रथम दोन कामगारांनी अटक केली व त्यानंतर प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी उर्फ छोटू चौधरी व त्याचा भाऊ परवेजअली इदरीस चोैधरी यांना अटक केली आहे़

अंबड पोलिसांनी याप्रकरणात बुधवारी शिवसेना नगरसेवकाचे पती बाळा दराडे यांची सुमारे दोन चौकशी करून जबाब नोंदवून घेतला़ तर भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे व शिवसेना नगरसेवकपुत्र सचिन राणे यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ मात्र, यापैकी शहाणे यांनी महापालिकेची महासभा तर राणे यांनी शिवसेना मेळावा असल्याचे सांगितल्याने त्यांची नंतर चौकशी केली जाणार आहे़ दरम्यान, छोटू चौधरी व त्याचा भाऊ परवेज अली चौधरी यांच्या पोलीस कोठडीत १५ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ तर उर्वरीत दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाईकांची चौकशीबॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात संशयाच्या भोव-यात असलेल्या पोलिसांकडून नगरसेवक व नगरसेवकांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असून त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जात आहेत़ मुळात नगरसेवकांसह संशयित पोलिसांची वरीष्ठ पोलीस अधिकाºयाकडून चौकशी होणे गरजेचे असताना या चौकशीतून काय निष्पन्न होणार याबाबत शंकाच आहे़ दरम्यान, या प्रकरणात सातपूर मधील एका नगरसेवकाचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे़कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही

बॉश स्पेअरपार्ट चोरी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामध्ये सर्वच संशयितांची चौकशी केली जाणार आहे़ राजकारणी असो वा पोलीस कर्मचारी असो कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही़ मुख्य सूत्रधार चौधरी हा कंपनीतून माल कसा चोरी करीत होता, त्यास कंपनीतील कोणाची साथ होती, बनावट माल कुठे विक्री केला जात होता अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून घेतली जाणार आहे़ बॉश कंपनीच्या बेंगलोर युनिटमधील अधिकारी व्हीक़ेक़दम यांनीही या प्रकरणाबाबत माहिती घेतली आहे़- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे

टॅग्स :NashikनाशिकtheftचोरीPoliticsराजकारणPoliceपोलिस