नाशिक : पाथर्डी गाव चौफुलीच्या पुढे असलेल्या राजवाड्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तिघा मित्रांनीच आपल्या मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ विशाल दावल हिरे (२१, रा़चेहेडी शिव, जकातनाका, पळसे, नाशिकरोड) असे खून झालेल्या रिक्षाचालक युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिन संशयितांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालक विशाल हिरे व त्याचे मित्र संशयित सागर शिंदे (रा़वडाळागाव), दीपक पगारे (रा़देवळाली गाव) व प्रमोद जाधव (रा़नाशिकरोड) हे चौघे रविवारी रात्री पाथर्डी चौफुलीच्या पुढे असलेल्या राजवाड्यासमोरील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते़ यातील तिघांचे विशाल हिरेसोबत वाद होऊन त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली़ यानंतर संशयितांनी मद्याच्या नशेत विशाल हिरेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये अतिरक्तस्त्राव झालेल्या विशालचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर तिघेही संशयित फरार झाले होते़या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे व इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला़ या प्रकरणाचा तपासाअंती पोलिसांनी संशयित सागर शिंदे, दीपक पगारे, व प्रमोद जाधव यांनी हा खून केल्याचे समोर आले़ पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून या प्रकरणी संजय दत्तात्रय बोरसे यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हिरे हा पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगारमद्याच्या नशेत खून करण्यात आलेल्या रिक्षचालक विशाल दावल हिरे हा पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली आहे़
यादीवरील गुन्हेगार हिरे खूनातील तिघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:35 PM
नाशिक : पाथर्डी गाव चौफुलीच्या पुढे असलेल्या राजवाड्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तिघा मित्रांनीच आपल्या मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ विशाल दावल हिरे (२१, रा़चेहेडी शिव, जकातनाका, पळसे, नाशिकरोड) असे खून झालेल्या रिक्षाचालक युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी इंदिरानगर ...
ठळक मुद्देमद्याच्या नशेत शस्त्राने वारइंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल