ठळक मुद्देतक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारले मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना रंगेहाथ पकडले़ मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु
नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकत आजोबाच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारणारे मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़१३) सापळा लावून रंगेहाथ पकडले़
पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावच्या दिवाणी न्यायालयाने मालेगाव कॅम्प सिटी सर्व्हे नंबर ८११ अ व ८१२ अ ही मिळकत तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे होण्याबाबत आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार ही मिळकत आजोबांच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा देण्यासाठी मालेगाव कॅम्पमधील नगर भूमापन अधिकारी अरुणदास बैरागी यांच्याकडे अर्ज केला होता़ मात्र हे काम करण्यासाठी बैरागी यांनी अर्जदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली़ याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली होती़या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक विभागाने बुधवारी मालेगाव कॅम्पमधील नगर भूमापन कार्यालयात सापळा लावला होता़ त्यानुसार तक्रारदाराकडून मागणी केलेल्या दहा हजार रुपयांपैकी सहा हजार रुपये बैरागी यांनी स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्यावर मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़तक्र ार करण्यासाठी संपर्क साधा़
शासकीय कार्यालयांमधील अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर त्याची तक्र ार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालयाशी संपर्क साधा़- पंजाबराव उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक