नाशिक : १९८८ साली १४५ संलग्न वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत आजमितीस ३४६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत़ विद्यापीठाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून काळानुरूप विद्यापिठाने केलेले डिजीटलायझेशन हे कौतुकास्पद आहे़ या विद्यापठास लाभलेले कुलगूरू डॉ़ दिलीप म्हैसेकर व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे विद्यापीठाची ही प्रगती असल्याचे गौरवोद्गार प्रमुख अतिथी तथा नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी केले़ विद्यापीठाचा विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवारी (दि़१०) त्या बोलत होत्या़
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय विद्याशाखेतील डॉ़ अशोक अनंत महाशूर, डॉ़ सय्यद अब्दुस सामी, डॉ़ विलास दत्तोपंत वांगीकर, आयुर्वेद विद्याशाखेतील डॉ़ अनंत भगवंत धर्माधिकारी, डॉ़ गांधीदास सोनाजीराव लवेकर, डॉ़ पांडुरंग हरी कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला़ तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या आरोग्य विद्याशाखेनिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या ४० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेचे सात विद्यार्थी, दंत विद्याशाखेचे तीन विद्यार्थी, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे ११, होमिओपॅथी विद्याशाखेचे चार विद्यार्थी आणि तत्सम विद्याशाखेच्या १५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
आरोग्य विद्यापीठाने विसाव्या वर्धापन दिनापासून सुरू केलेल्या ई-पेमेंट गेटवे या आॅनलाईन शुल्कप्रणालीचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्या उद्घाटन करण्यात आले़ यावेळी व्यासपीठावर आयुष संचालनालय मुंबईचे संचालक कुलदीप राज कोहली, विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ़मोहन खामगांवकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयचे संचालक डॉ़प्रविण शिनगारे, कुलसचिव डॉक़ालिदास चव्हाण उपस्थित होते़सुवर्णपदक प्राप्त वैद्यकीय विद्यार्थीपदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या आरोग्य विद्याशाखानिहाय विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य (सुवर्णपदक) मिळविणाºया ४० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके जाहीर करण्यात आली होती़ यापैकी उपस्थित वीस विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात आला़ यामध्ये सायन मुखर्जी - बायोकेमिस्ट्री (ग्रँट गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज मुंबई), बन्सल वरूण विवेक - ह्यूमन अॅनाटोमी (सेठ जी़एस़ मेडीकल कॉलेज, मुंबई), शांभवी चौधरी - पॅथालॉजी (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, वर्धा), गद्दाम रुता चंद्रकांत - फॉरेन्सिक मेडिसीन अॅण्ड टॉक्सीकोलॉजी (अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर), नाईक अश्विनी नागेश -एमबीबीएस पार्ट -१ (गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, मिरज), जांद्याला आनंद शंकर - आॅप्थेमोलॉजी (आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे), हाकिम युसूफ शेखादम - इएनटी (पीव्हीव्हीपीएफ अहमदनगर हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल कॉलेज, अहमदनगर), पापडेजा वैष्णवी बिणेश - संस्कृत (एसएसटी आयुर्वेद कॉलेज, संगमनेर), पोकारणेकर प्रज्ञा धनाजी - संस्कृत (जे़जे़मग्दुम आयुर्वेद कॉलेज, कोल्हापूर), नाडर अर्थी स्टेनली - बीएमएमएस पार्ट -१ (आऱए़पोदार आयुर्वेद कॉलेज, मुंबई), वाघ प्रेरणा प्रकाश - बीएमएमएस पार्ट -१ व २ (ए़एस़संघ आयुर्वेद कॉलेज,नाशिक), कोकरे अभिषेक दिलीप - बीएमएमएस पार्ट -१ व २ (जे़जे़मग्दुम आयुर्वेद कॉलेज, कोल्हापूर), सईद शहीफा शकील - बीयुएमएस (मोहम्मदिया युनानी कॉलेज, मालेगाव), अस्मा नाझ मोमीन इक्बाल अहमद - बीयुएमएस (मोहम्मदिया युनानी कॉलेज, मालेगाव), सिद्दीकी मोमीना खातून मोहम्मद सलीम - बीयुएमएस (झेड़व्ही़एम़ युनानी कॉलेज, पुणे), लाड श्रीया नारायण - आॅर्गनॉन (गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज, मिरज), शेख सायमा गौर - सर्जरी (गुरु मिस्ट्री होमिओपॅथिक कॉलेज, शेगाव), नेवगे मानसी भाऊ (टी़एऩमेडिकल कॉलेज, मुंबई), टिक्कू साक्षी अवतार (सेठ़जी़एस़मेडिकल कॉलेज,मुंबई), वैष्णवी श्रीवास्तव (इन्स्टिट्यूट आॅफ फिजीकल मेडीसीन महालक्ष्मी, मुंबई), फेस्टी जॉनी - नर्सिंग (आयएनएचएस अश्विनी कोलाबा, मुंबई), शेट्टी मॅक्जिना मायकल - नर्सिंग (साधू वासवानी कॉलेज, पुणे) यांचा समावेश होता़