नाशिक : पंचवटीच्या फुलेनगरमधील सराईत निकम गँगचा म्होरक्या शेखर निकमसह त्याच्या उर्वरीत चौघा साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंगल यांनी पाठविलेल्या मोक्काच्या (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाईच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली आहे़ या गँगविरोधात खून, खंडणी, हाणामाारी अशो अनेक केसेस आहेत़
पंचवटीच्या फुलेनगर परिसरातील भराडवाडीतील सराईत गुन्हेगार शेखर निकम व त्याच्या चार साथीदारांनी संदीप लाड या युवकाकडे वेळोवेळी खंडणी मागून खंडणीस विरोध केला म्हणून गोळी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खंडणी, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के़डी़वाघ यांनी सराईत गुन्हेगार शेखर राहुल निकम व त्याच्या साथिदारांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठविला होता़ या प्रस्तावानुसार शेखर राहुल निकम याच्यावर नऊ गुन्हे, विशाल चंद्रकांत भालेराव याच्यावर १४, संतोष प्रकाश पवार याच्यावर एक, केतन राहुल निकम याच्यावर १ तर संदीप सुधाकर पगारे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत़पोलीस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत़