नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचवटीतील वाघाडीत सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट मद्य व तयार करण्याच्या साहित्यासह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज जप्त केला आहे़ यामध्ये राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या मध्यप्रदेश निर्मित मद्याची भेसळ केली जात होती़ दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच संशयित फरार झाले असून कारखान्याचा मालक व मद्याची भेसळ करणारे संशयित विवेक साबळे, गणेश लोंढे, प्रविण लोंढे, रविंद्र भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे,अधिक्षक सी.बी.राजपूत आणि उपअधिक्षक गणेश बारगजे यांना वाघाडीतील पडक्या घरात बनावट भेसळयुक्त मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार विभागीय भरारी पथक व अ विभागाच्या पथकाने संयुक्तपणे शुक्रवारी या घरावर छापा टाकला़ याठिकाणी मध्यप्रदेश निर्मीत बॉम्बे व्हिस्की व मॅकडॉवेल व्हिस्कीत भेसळ करून ते बाटलीत पॅक करण्याचे काम सुरू होते़ तसेच मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, बुचे असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़या परिसरातील एका झोपडीत मॅकडॉवेल व्हिस्कीचा सुमारे १५ हजार ३६० रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आढळून आला़ या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ निरीक्षक सी.पी.निकम,एस.डी.चोपडे,व्ही.ऐ.गोसावी,दुय्यम निरीक्षक एस.एस.गोगावले,योगेश सावखेडकर,सुनिल गायकवाड,पी.अे.ठाकरे,कडभाने जवान अस्वले,गांगुर्डे,माने,पाटील,पवार,भांगरे,पानसरे,बोराडे,शिंदे,कुवर,भालेराव,वाघ,परदेशी,चंद्रमोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
बनावट मद्य कारखान्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:34 PM
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचवटीतील वाघाडीत सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट मद्य व तयार करण्याच्या साहित्यासह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज जप्त केला आहे़ यामध्ये राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या मध्यप्रदेश निर्मित मद्याची भेसळ केली जात होती़ दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच संशयित फरार झाले असून ...
ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्क विभाग बनावट मद्य व तयार करण्याच्या साहित्यासह पाऊण लाखाचा ऐवज जप्त