शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

नाशिकमध्ये पालिका निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:55 AM

विदर्भ, पुण्यात अपेक्षेप्रमाणे भाजपच ठरली सरस

मुंबई : राज्यातील ११ महापालिकांमधील महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत लातूर आणि उल्हासनगरमध्ये सत्तांतर झाले. या दोन्ही महापालिकांवरील भाजपचे वर्चस्व संपले. नाशिकचा महापौर करण्याचा शिवसेनेचा प्रयोग फसला. लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर झाला. विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपचेच महापौर झाले.लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपाचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांचा दोन मतांनी पराभव केला. तर भाजपाचे चंद्रकांत बिराजदार यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर उपमहापौरपदी विजय मिळविला. दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.नाशिकला भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठीचा महाशिवआघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेतील सत्ता आबाधित राखण्यात भाजपला यश आले. महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौैरपदी भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली.विदर्भात महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. नागपूरमध्ये भाजपचे संदीप जोशी, मनीषा कोठे तर अकोला येथे भाजपच्या अर्चना मसने, राजेंद्र गिरी तसेच अमरावतीत भाजपचे चेतन गावंडे व कुसूम साहू आणि चंद्रपूरमध्ये राखी कंचर्लावार व राहुल पावडे विजयी झाले. परभणीत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे व भगवान वाघमारे विजयी झाले.पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरळीधर मोहोळ व उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उषा ऊर्फ माई ढोरे व तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविला. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नव्हते.नाशिकला मनसे भाजपसोबतनाशिक महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असतानाही दहा ते पंधरा नगरसेवक फुटल्याची चर्चा होती. हाच फायदा उठवून शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.हाच फायदा उठवून शिवसेनेने विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेची मजल बहुमतापर्यंत जाईल, असे दिसत होते.मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर केला, तर सात नगरसेवक असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदासाठी शिवसेनेची अडवणूक केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस