नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली हिचा शिवणकामाच्या कात्रीने ३६ वार करून खून करणारा आरोपी संजय रघुनाथ वाघ (३६, रा़मीनाताई ठाकरे गार्डन मागे, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासले तर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी तर गुन्ह्याचा तपास केला़शिवाजीनगर येथील रहिवासी आरोपी रघुनाथ वाघ हा पत्नी वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत असे़ २१ जुलै २०१५ रोजी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला़ यामध्ये राग अनावर झालेल्या रघूनाथ याने शिवणकामाच्या कात्रीने पत्नीवर मुलगा जयेश (८) व मुलगी हर्षदा (६) या दोघांसमोर सपासप वार करून तिचा खून केला़ यानंतर दोन्ही मुलांना सोबत घेऊन प्रथम सातपूर व त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल होत पत्नीचा खून केल्याची कबुली देत फिर्याद दिली़या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये त्याची दोन्ही लहान मुले,पत्नीचा शिवणक्लास घेणारी महिला, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता़ विशेष म्हणजे या खटल्यात रघूनाथचा लहान मुलगा योगेश याने आपला जबाब फिरविला होता़ मात्र, खुनाच्या घटनेनंतर पोलिसांना दिलेला जबाब तसेच पत्नीच्या रक्ताचे आरोपीच्या कपड्यांवरील डाग, केमिकल अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गृहित धरून त्यास दोषी ठरविण्यात आले़न्यायाधीश शिंदे यांनी आरोपी रघूनाथ वाघ यास जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ पोलीस निरीक्षक देवीकर यांनी या गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले होते़
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाºया पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:11 PM
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली हिचा शिवणकामाच्या कात्रीने ३६ वार करून खून करणारा आरोपी संजय रघुनाथ वाघ (३६, रा़मीनाताई ठाकरे गार्डन मागे, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़१२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासले ...
ठळक मुद्देचारित्र्यावर संशय ; कात्रीने ३६ वार करून खूनपोलीस ठाण्यात दाखल होत पत्नीचा खूनाची कबुली जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास