नाशिक : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठयाच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरूवारी (दि.23) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाºया कोलकाता येथील दोन मुलींसह दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पिटान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़पंचवटीतील मेरी - रासबिहारी लिंकरोडवरील अमृतधाम येथील एका गायी म्हशीच्या गोठयामागे संशयित संतोष कारभारी खैरे (४२, राहणार अमृतधाम) व त्याचा आसाम येथील साथीदार अल्फास मिया उर्फ राजू (३२) हे दोघे गत काही वर्षांपासून विविध राज्यातील महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून काही बनावट गिºहाईक पाठविले़ या गोठयामागे बांधलेल्या खोलीत युवती व महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्री पटताच सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांनी दोन युवती व अनैतिक व्यवसाय चालविणारा जागामालक खैरे व दलाली करणारा अल्फास मिया या चौघांना ताब्यात घेतले़दरम्यान, गत अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोलकाता, आसाम अशा परराज्यातील युवती व महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची तक्रार होती़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चौघांकडून अनैतिक व्यवसायांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़ तसेच संशयित खैरे यास परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे टोळके व राजकीय पदाधिकाºयांचा पाठबळ असल्याची चर्चा आहे़
नाशिकमध्ये अनैतिक व्यवसायावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 8:26 PM
नाशिक : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठयाच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरूवारी (दि.23) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाºया कोलकाता येथील दोन मुलींसह दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पिटान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
ठळक मुद्देपंचवटी पोलिसांची कारवाई परराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यात