शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
2
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
3
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
4
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
5
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
6
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
7
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
8
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
9
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
10
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
11
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
12
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
13
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
14
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
15
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
16
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
17
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
18
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
19
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
20
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

‘नॅट’मुळे आता सुरक्षित रक्त पुरवठा

By admin | Published: June 06, 2014 12:55 AM

‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेले जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अँसिड अँम्पलिफिकेशन

चाचणीत आढळले दोन एचआयव्ही पॉझिटिव्ह नागपूर :  ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित  असलेले जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अँसिड अँम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान दाखल झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित रक्त  पुरविणे शक्य झाले आहे, अशी माहिती लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.    मध्यभारतात पहिल्यांदाच ‘नॅट’ हे तंत्रज्ञान ‘लाईफ लाईन रक्तपेढीत’ दाखल झाले आहे. या संदर्भात माहिती देताना डॉ. वरभे म्हणाले, रुग्णाला रक्त  देताना चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये एड्स (एचआयव्ही-१, एचआयव्ही-२), हिपॅटायटिस (कावीळ)- बी, हिपॅटायटिस-सी,  गुप्तरोग आणि मलेरिया. या रोगजंतूसाठीच्या चाचण्या करून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री केली जाते. पूर्वी या चाचण्याचा अहवाल प्रचलित  इलिसा तंत्रज्ञानाच्या निष्कर्षावर काढला जायचा. यात विशेषत: एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट यायला विंडो पिरियड कालावधी ३0 दिवसांचा  लागायचा. यात दूषित रक्त रुग्णाला जाण्याची शक्यता असायची. आता या ‘नॅट’ तंत्रज्ञानाने केवळ सहा ते आठ दिवसांमध्ये या चाचणीचा अहवाल  कळतो. जेथे ‘कावीळ बी’ निष्पन्न होण्याचा कालावधी इलिसाने ५८ दिवसांचा आहे, तेथे नॅटने हे १२ ते १५ दिवसांमध्ये होते. इलिसाने ‘कावीळ  सी’साठी ७0 दिवस लागत असून नॅटने ते फक्त ८ ते १२ दिवसांच्या कालावधीत निष्पन्न होते. या तंत्रज्ञानामुळे विषाणूंचा संसर्ग आदी सुरुवातीच्या  काळात, लवकरात लवकर अचूकपणे शोधणे शक्य झाले आहे.     लाईफ लाईन रक्तपेढीमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञान पूर्णत: अँटोमॅटिक आहे. हे तंत्रज्ञान आल्यापासून आतापर्यंंंत सुमारे ४५0 ते ५00 जणांच्या रक्ताची नॅट  तपासणी करण्यात आली. यातील दोघे एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक अहवाल आला. ‘इलिसा’ तंत्रज्ञानात एवढय़ा लवकर निदान  होणे शक्यच नव्हते. सुरक्षित रक्त पुरवठा आता खर्‍या अर्थाने शक्य झाले आहे. नॅट तंत्रज्ञान असलेले नागपूर शहर हे विसावे शहर झाले आहे.  कर्नाटकमध्ये दीड वर्षांंंपूर्वीच शासकीय रुग्णालयांमध्ये नॅट तपासणी आवश्यक केली आहे. रक्तपेढीतील या नॅट लॅब ‘पँथर’चे उद्घाटन ७ जून रोजी  पद्मश्री डॉ. आर.डी. लेले यांच्या हस्ते होईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत रक्तपेढीच्या संचालिका  डॉ. वनश्री वरभे उपस्थित  होत्या.(प्रतिनिधी)