मुंबई : राज्यात काही काळापूर्वी पाच हजार किलोमीटर इतकेच राष्ट्रीय महामार्ग होते. ते आता २२ हजार किमीवर पोहोचले आहेत. हे रस्ते राज्यात असले, तरी त्यावर आपण काहीच करू शकत नाही. राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाबाबत आनंदराव पाटील यांनी प्रश्न विचारला होता. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कामे पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राज्य सरकार सहसा हस्तक्षेप करत नाही. आनंदराव पाटील यांनी प्रश्न विचारला होता.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:43 AM