- अतुल कुलकर्णीमुंबई : भाकरी फिरवली नाही तर करपून जाते, असे जाहीर सभांमधून उदाहरण देणाºया राष्टÑवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच नेमलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्या चेहºयांना घेऊन नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षातील तरुणांमध्ये नाराजी उसळली आहे. शिवाय अजित पवार यांना मानणाºया एका मोठ्या गटाला यातून पद्धतशीरपणे बाजूला ठेवले गेले आहे.भाजपात जाणार अशी चर्चा असणाºया अनेक नेत्यांना नवीन कार्यकारिणी घेण्यात आले आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून बुथ कमिट्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १७ ते १८ हजार कार्यकर्त्यांची नोंद झाली आहे, असे सांगण्यात आले. एवढी नोंदणी तर एका तालुक्यात भाजपाने केली आहे, मात्र आमचे नेते एवढ्या आकड्यावरही समाधानी आहेत, अशी खोचक टीकाही एका नाराज नेत्याने केली. जे लोक भाजपाच्या वाटेवर होते, त्यांना कार्यकारिणीत घेऊन गोंजारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र या संपूर्ण कार्यकारिणीत एकही नवीन युवा चेहरा घेण्यात आलेला नाही. भाकरी फिरवणे तर दूरच, ती आहे तेथून तसूभरही हलवली गेली नाही. राज्यात भाजपाविरुद्ध वातावरण तयार होत असताना आमचे नेते मात्र त्याच त्या पारंपरिक राजकारणात गुंतल्याचेही संबंधित नेता म्हणाला. जिल्हाध्यक्ष नेमतानाही अनेक जिल्ह्यात आहे त्यांनाच कायम ठेवले आहे.याच वागण्याला कंटाळून आपण राष्टÑवादी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये आल्याचे डॉ. गजानन देसाई म्हणाले. आमच्याकडे डॉ. रवी बापट हापकीनमध्ये, सुधाकर परिचारक एसटी महामंडळावर, नकुल पाटील सिडकोवर, रत्नाकर महाजन नियोजन मंडळावर, सुभाष मयेकर सिध्दीविनायक ट्रस्टवर आणि अनेक जण मंत्री म्हणून किती वर्षे काम करत होते, याची यादी तपासा म्हणजे सत्य कळेल. पदांवर याच लोकांनी रहायचे आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या हे किती दिवस करायचे म्हणून आपण व्यथित होऊन पक्ष सोडल्याचेही डॉ. देसाई म्हणाले.नवी मुंबईत नाईक, रायगडमध्ये तटकरे कुटुंबाचे वर्चस्वकार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या अनेक नेत्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. आमच्यातल्या अनेक नेत्यांनी सुभेदाºया दिल्याप्रमाणे एकेक जिल्हे वाटून घेतले आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, ज्ञानेश्वर नाईक तर रायगडमध्ये सुनील तटकरे, अनिल तटकरे, अवधूत तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, उस्मानाबादेत पद्मसिंह पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, जीवन गोरे, अनिल पाटोदेकर, राहूल मोटे तर नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ अशी यादी किती जिल्ह्याची द्यावी असेही काहींनी सांगितले.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:27 AM