ठाणे, दि.24 - ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही न केल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा रेतीबंदर येथील विसर्जन घाटासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून महाआरती केली.
दरम्यान, आगामी तीन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाहीत; तर उरलेला रस्ताही खोदून टाकू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला. रेतीबंदर विर्सजन घाटासमोर असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची मूर्ती घेऊन ठाण मांडले.