मुंबई : कोणत्याही परिस्थितीत आम्ही आघाडी करूनच लढू, असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलेले असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीने सर्व 288 विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी लढणार असलेल्या आणि न लढणार असलेल्या अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाला मोठय़ा प्रमाणात गळती लागण्याची चिन्हे असून, ती रोखण्यासाठी सर्व ठिकाणच्या इच्छुकांना आशेवर ठेवण्याचा हेतू अर्ज मागविण्यामागे असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, 11 ते 2क् ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रदेश कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. काँग्रेससोबत आमची आघाडी होणार आहे. मात्र, काही जागांची अदलाबदल झाली, काही जागा वाढूवन मिळाल्यास उमेदवार तयार असावेत म्हणून 288 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.