Jayant Patil, Maharashtra Politics: व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका करणारी रॅप सॉंग्स तयार करत आहेत. या युवकांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना पोलीस स्टेशन्सला बोलावून बसवून ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचे प्रकार पोलिसांकडून सुरु आहेत याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
एखादा शब्द अश्लील आहे की नाही याबाबत प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. एखाद्या ठिकाणी सर्रास वापरला जाणारा शब्द कोणाला अश्लील वाटू शकतो. म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येणार नाहीत असे खडेबोल जयंत पाटील यांनी सरकारला सुनावले आहेत.
काय आहे प्रकार?
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आणि पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर एका तरुणांना अश्लील शब्द असलेलं रॅप गाणं गायले. या रॅप गाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. शुभम जाधव असं या तरुण रॅपरचं नाव आहे. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं आहे. या तरुणाची आता चौकशी केली गेली.