शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रीयत्व हेच हिंदूत्व : संभाजी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:59 PM

नाशिक : हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदू संस्कृती आणि धर्म आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो लढा उभारला आणि गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या देवताचे कतृत्व समाज विसरत चालला आहे, अशी खंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष ...

ठळक मुद्देअज्ञात समाजकंटकांनी पेट्रोलची बाटली फेकून बस जाळण्याचा प्रयत्न केलारायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्संस्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीशिवरायांविषयीचा मान-सन्मान, आदर-अभिमानाचा विसर पडला

नाशिक : हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदू संस्कृती आणि धर्म आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो लढा उभारला आणि गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या देवताचे कतृत्व समाज विसरत चालला आहे, अशी खंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्संस्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी (दि. १०) भिडे यांची रविवार कारंजा परिसरातील एका सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिडे यांनी ‘हिंदू धर्म व संस्कृती महात्म्य आणि छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आपले मत मांडले.राज्यकर्ते आणि समाज हा स्वार्थी प्रवृत्तीचा असून, त्यांनी शिवरायांविषयीचा मान-सन्मान, आदर-अभिमानाचा विसर पडला आहे. हा समाज त्यांच्यासोबत लबाडी करत असल्याची टीकाही यावेळी भिडे यांनी केली. आजची पिढी शिवरायांच्या भूमीत आणि हिंदुस्थानात उच्चशिक्षण घेऊन आणि बक्कळ पैसा मिळविण्याच्या आमिषापोटी इंग्रजांच्या भूमीत जाऊन चाकोरी करतात व मातृभूमीचे ऋ ण विसरतात अशांना भारतीय म्हणण्याची मुळीच गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सभेचा समारोप ‘शिवरायांचे आठवावे रूप...’ या ध्येयमंत्राच्या सामूहिक पठणाने झाला. संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास सुरू झालेले भिडे यांचे भाषण सव्वानऊ वाजता संपले. यावेळी सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी सायंकाळच्या सुमारास काही विरोधकांना पोलिसांनी शालिमार चौकातच रोखून धरत त्यांची समजूत काढल्याने सभा शांततेत पार पडली. सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.--इन्फो--

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज