शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नगरसेवकांची मते फोडण्यासाठी नेटाचे प्रयत्न

By admin | Published: March 04, 2017 2:15 AM

महापौरपदासाठी शिवसेना अपक्षांना गळाला लावत असताना सबुरी ठेवणारे भाजपही आता सक्रिय झाले आहे

मुंबई: महापौरपदासाठी शिवसेना अपक्षांना गळाला लावत असताना सबुरी ठेवणारे भाजपही आता सक्रिय झाले आहे. गेली दहा वर्षे शिवसेनेबरोबर असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी तसेच मुमताज शेख या आणखी एका अपक्ष नगरसेविकेचे समर्थन मिळवत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकांची मतं फोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. त्यात मनसेने महापौरपदाचा फॉर्म घेतल्याने अधिक रंगत वाढली आहे. आपल्याला गृहित धरु नये, असे संकेत मनसेकडून देण्यात येत आहेत. भाजपाने डिवचल्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न ठरलेल्या महापौर पदासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यानुसार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेने पाचपैकी चार अपेक्षांचे मत आपल्याकडे वळवले. यामध्ये गेली दहा वर्षे पाठिंबा देऊन महापौर निवडून आणण्यात मदत करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे समर्थन यावेळीही शिवसेनेने गृहित धरले. मात्र आतापर्यंत नरमाईची भूमिका घेत युतीबाबत अनुकूल असल्याची पेरणी करणाऱ्या भाजपच्या गोटात वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला गाफील ठेवत भाजपाने दोन नगरसेविकांची मतं फोडली आहेत.पारंपरिक मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मुख्यालयात जाऊन अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र तिथे त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नसल्याचे अंदाज येताच गवळी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहचल्या आणि रातोरात त्यांचे मतपरिवर्तन झाले. या चर्चेमध्ये भाजपने गवळी यांना मोठ्या पदांचे अमीष दिल्याचे समजते. तर प्रभाग क्रमांक १०२ च्या नगरसेविका मुमताज शेख या अपक्ष नगरसेविकेनेही भाजपलाच कौल दिला आहे. भाजपच्या या गनिमी काव्यामुळे अधिक संख्याबळासाठी शिवसेनेत धावाधाव सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)अभासेबरोबर बोलणी का फिस्कटली?पारंपरिक मित्र पक्ष म्हणून अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवल्या. त्यानुसार पाच वर्षांसाठी आरोग्य समितीचे अध्यक्षपद किंवा पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्यत्व अशी अट त्यांनी ठेवली. मात्र एका नगरसेवेकाच्या समर्थनासाठी ही अट मान्य केल्यास अन्य अपक्षांचाही भाव वधारेल, अशी भीती असल्याने शिवसेनेने त्यांची मागणी अमान्य केली. मात्र त्यावेळीस लवकरच सांगते बोलून निघालेल्या गवळी थेट वर्षा बंगल्यावर पोहचल्या. तिथे भाजपबरोबर वाटाघाटी झाल्यानंतर गवळी यांनी आज कोकण भवनात गटनोंदणी केली. अशी आहे रस्सीखेच !शिवसेनेकडे ८४ नगरसेवक असून चार अपक्षांचे त्यांना समर्थन आहे. म्हणजेच सेनेचे संख्याबळ ८८ आहे. भाजपनेही दोन नगरसेविकांचे समर्थन मिळवून महापौर पदाच्या शर्यतीत भाजप असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भाजपच्या पुढे असल्याच्या आनंदात असलेल्या शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. त्यात भाजप काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मतं फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचे समजताच शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आपले पर्याय पुन्हा एकदा चाचपण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. >मनसे निर्णायक काँग्रेस आपला उमेदवार महापौर पदाच्या निवडणुकीत उभा करणार आहे. तर भाजपनेही जमवाजमव सुरु करून महापौर पदावर सहजासहजी पाणी सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेला साथ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे ८८ सदस्यांचे बळ आहे. तर भाजपाकडे सध्या ८४ नगरसेवक झाले आहेत. भाजपाकडे शिवसेनेपेक्षा चार मतं कमी असली तरी काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी शिवसेनेसाठी सात नगरसेवक असलेल्या मनसेचे मत निर्णायक ठरू शकते. त्यात मनसेने देखील महापौर पदाचा फॉर्म घेतल्याने मनसेच्या खेळीकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. >महापौर पदाच्या शर्यतीतून कोटकही बाहेर महापौरपदाचे संभाव्य उमेदवार असलेले मनोज कोटक यांची पालिकेच्या गटनेतेपदी आज नियुक्ती करण्यात आली. कोटक यांना गटनेतेपद देऊन महापौरपदासाठी मराठी चेहराच देण्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. भाजपाचे महापौरपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून मनोज कोटक, डॉ. राम बारोट, प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि महादेव शिवगण यांची नावे चर्चेत होती. परंतु महापौर पदासाठी गुजराती उमेदवार दिल्यास भाजपच्या विरोधात संदेश जाऊ शकतो. त्यात विधानसभेची निवडणूक ही अडीच वर्षांनी असल्याने महापौरपदावर गुजराती उमेदवार भाजपाला हानिकारक ठरेल. त्यामुळे कोटक हे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. राम बारोट यांच्या नावाचीही शक्यता नाही. त्यामुळे प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे आणि महादेव शिवगण या तिघांमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.