बीड/परभणी : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड आणि परभणी जिल्ह्यांतील दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील बाबासाहेब शामराव नागरगोजे (४८) या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. नागरगोजे यांना एक एकर जमीन असून, त्यातील कापूस पावसाअभावी जळून गेल्याने व मुलीच्या लग्नासाठीचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे.दुसरी घटना परभणी तालुक्यातील आर्वी येथे घडली. सुदाम जनार्दन हरकळ (२२) या युवा शेतकºयाने शनिवारी रात्री शेतात कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली.यवतमाळमध्येही आत्महत्यापोफाळी (यवतमाळ) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतक-याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील आंबाळी येथे घडली. शिवाजी भीमराव दांडेगावकर (३५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे दीड लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.
नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतक-यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 3:05 AM