मुंबई : पवनहंस हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र एका वैमानिकाचा मृतदेह सापडल्यानंतर नौदल, कोस्ट गार्डकडून शोधमोहीम थांबविण्यात आली आहे, तर ओएनजीसीने मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास पवनहंस कंपनीच्या डाऊफिन हेलिकॉप्टरने सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रात्रीच्या लँडिंगच्या सरावासाठी उड्डाण केले आणि एका छोट्या तेलफलाटावर उतरण्याच्या तयारीत असतानाच त्याने पुन्हा उड्डाण केले आणि काही क्षणांतच ते समुद्रात कोसळले. मुंबईपासून ८२ सागरी मैल अंतरावर ही घटना घडल्यानंतर यातील वैमानिक कॅप्टन ई. सॅम्युएल आणि सहवैमानिक निवृत्त कर्नल टी.के. गुहा हे दोघे मृत झाले. यातील एका वैमानिकाचा मृतदेह ९ नोव्हेंबर रोजी सापडला. त्यानंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. मात्र त्यानंतरही दुसऱ्या वैमानिकाचा तपास न लागल्याने नौदल व कोस्ट गार्डकडून ही मोहीम थांबविण्यात आली.
नौदल, कोस्ट गार्डने थांबविली शोधमोहीम
By admin | Published: November 20, 2015 1:42 AM